PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 28, 2024   

PostImage

मोदी तेरे राज मे !


देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या राजवटीला दहा वर्ष पूर्ण होऊन गेले आणि पुढेही सुद्धा त्यांच्याच हातात देशाची धुरा राहणार आहे,असं म्हणायला काहीही हरकत नाही.कारण अब की बार 400 पार म्हटल्यावर देशाची धुरा मोदीजीच सांभाळणार.

मोदी साहेब आज पर्यंतच्या पंतप्रधानांपैकी सर्वात यशस्वी पंतप्रधान आहेत,असं त्यांचेच कार्यकर्ते म्हणतात.मला एक प्रश्न पडतो की,मोदीजी एक यशस्वी पंतप्रधान आहेत तर यशस्वी पंतप्रधानाच्या राजवटीत सामान्य माणूस किती भरडला जातोय याची काळजी यशस्वी पंतप्रधानाला वाटत नसेल तर नवल वाटण्यासारखीच बाब आहे.

महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले.देशातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही.कृषी पंप धारकांना 24 तास वीज मिळत नाही.बेरोजगाराच्या हाताला काम नाही,तरी परंतु मोदी साहेब स्वतःला यशस्वी पंतप्रधान समजतात,म्हणजे एकावे ते नवलंच,असं म्हणण्याची वेळ जनतेवर आलेली आहे.आंधळ दळतोय अन कुत्र पिठ खातोय,अशी अवस्था सामान्य जनतेची होऊन गेलेली आहे.

मोदी साहेब एखाद्या वेळी रोजी रोटी करणाऱ्या कुटुंबाकडे बारीक नजरेने आणि सद्सद विवेक बुद्धीने डोकावून पहा एका वेळेच्या जेवणाची सोय राहत नाही,असे कितीतरी कुटुंब देशात वास्तव्यास आहेत.गरीब शेतकरी दिवसभर आपल्या संसाराच्या गाडा चालविण्यासाठी शेतात राबराब राबतात परंतु भारनियमना मुळे शेतीची नापिकी होऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ येतोय त्यांच्याकडे जरा गांभीर्याने पहा.कितीतरी उच्चशिक्षित तरून रोजगार नाही म्हणून दिवसभर रस्त्याने फिरताना दिसतात,असे कितीतरी उदाहरणे देता येतील जरा याची सुद्धा जाणीव असू द्या.

देशाचे पंतप्रधान आपकी बार 400 पार चा नारा देत आहेत.मी म्हणतोय मोदी साहेब 400 नाही,547 जागा तुम्ही जिंका.आमचा काही एक आक्षेप राहणार नाही,परंतु सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी महागाई कमी करा,शेतमाला योग्य भाव द्या,कृषी पंप धारकांचे भारनियमन बंद करा आणि बेरोजगाराच्या हाताला काम द्या जेणेकरून त्यांच्या कपाळावर लागलेला बेरोजगारीचा कलंक पुसल्या जाईल आणि देशाचा युवक अभिमानाने सांगेल,मोदी है तो मुमकिन है,नाहीतर

|| आले या भोगाशी असावे सादर,देवावरी भार ठेवूनीया ||


PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 5, 2024   

PostImage

शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर व्याज घेतल्या जाते,क्यूकी ये मोदी की गॅरंटी …


भारतीय शेतकरी हा देशाच्या कणा आहे .शेतकरी देशाचा बळीराजा आहे आणि शेतकरी देशाच्या पोशिंदा आहे.अशी मोठमोठी आभूषणे शेतकऱ्यांच्या नावावर लागून शेतकऱ्यांचे अर्धेअधिक कंबरडे सरकारने आधीच मोडीत काढले,अन आता शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करू अशी पोकळ वलग्ना करून सरकारने शेतकऱ्यांना भिकेच्या प्रवाहात खेचण्याच्या प्रयत्न होताना दिसतो आहे आणि तसेच होणार आहे,क्युकी ये मोदी की गॅरंटी है.

आधी शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावर मुदती आधी भरण केल्यावर बिनव्याजी कर्ज मिळत होते,आता जग बदलत चाललंय त्याचप्रमाणे शेतकऱ्यांविषयी सरकारचे धोरणं देखील बदलत चाललेयं,म्हणून पीक कर्जावर सरकारने सरसकट व्याज वसूल करणे सुरू केलेली आहे कारण हे मोदी के गॅरंटी है.

 देशात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही,दिवसेंदिवस शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली भरडला जात आहे,शेतीचा व्यवसाय डब्घाईला येण्याच्या मार्गावर आहे,शेती व्यवसाय हा न परवडणारा व्यवसाय म्हणून कित्येक शेतकरी बांधवांनी आपली जीवन यात्रा संपवून मोकळे झाले आहेत.कित्येक शेतकऱ्यांचे संसार आज उघड्यावर पडले आहेत.शेती नापीक होताना दिसतो आहे आणि अशा नापीक होणाऱ्या शेती व्यवसायावर आता शेतकऱ्यांच्या विश्वास बसेनासा झाला आहे आणि याला जबाबदार सरकारचे धोरण आहेत,तरी पण देशाचे पंतप्रधान सांगत फिरत आहेत की ये मोदी की गॅरंटी है.

देशातील शेतकरी सरकारच्या धोरणांविषयी कंटाळून गेलेला आहे आणि शेतकऱ्यांविषयी सरकारकडून काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि सरकारकडे सुद्धा शेतकऱ्यांविषयी ठोस असा कार्यक्रम नाही.निवडणुका आल्या की थातूर-मातूर योजना सांगून मत पदरात पाडून घेणे एवढेच सरकारचा कार्यक्रम असून,निव्वळ भूलथापा आहेत अन एखदा मत पदरात पडलं की जैसे थे अशी परिस्थिती आहे,तरी पण देशाचे पंतप्रधान दम न घेता भोळ्याभाबड्या जनतेला सांगत फिरत आहे की ये मोदी की गॅरंटी है.

 

आणखी वाचा : आमदार साहेब पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करा

 शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू म्हणणारे सरकार शेतातील कृषीपंप धारकांवर भारनीयमनाचा बडगा उभारून शेतकऱ्यांना पिकांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.भारनीयमनामुळे कित्येक शेतकऱ्यांचे उभे पीक नष्ट झालेली असताना,अपुऱ्या विजेमुळे दुबार पीके देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत,त्यांच्या मागणीकडे सरकार जाणून-बुजून कानाडोळा करताना दिसतो आहे.म्हणजे शेतकरी मरणाच्या दारात आला तरी सरकारला काहीच सोयर सुतक नाही.इकडे शेतकरी मरतो आहे तरी पण ये मोदी की गॅरंटी है.